होय ते प्रेमच होते...

Started by pallavi wadaskar, July 17, 2015, 11:45:33 AM

Previous topic - Next topic

pallavi wadaskar

होय ते प्रेमच होते
मैत्रीचे नाव देऊन
माझे प्रेम निभवत होते
खट्याळ तुझ्या चेहऱ्यांवर हसु फुलवून
मी माझ्याच भावनांशी झुंजत होते
पाहताच तुला
आठवला तो पाऊस
आठवल ते ढगाळलेल आकाश
वाटायला लागले
गर्जेल नव्याने गीत गात
एकाच वाटेने लागले चालू
सवांद आपल्यात नाही तर
आपल्या मनाचा लागलाय होउ
कधी डोळे तर कधी मन
मात्र ओठांवरून शब्दच नाहीसे झाले
पाऊस तर एक निमित्त होते
होय ते प्रेमच होते


http://manatilchandane.blogspot.in/

pallavi wadaskar