त्या सावलीमध्ये ………

Started by शितल, July 19, 2015, 06:40:44 PM

Previous topic - Next topic

शितल

हळवं हे मन
त्याला नाही दर्पण
शोधे स्वताला
त्या सावलीमध्ये .........

कळते ना त्याला
ना पाही स्वताला
घुटमळते का?
त्या सावलीमध्ये .........

सवयच बुरी ती
नाही खरी ती
जगलेच का?
त्या सावलीमध्ये .........

निरुत्तर जागा
जीवाचा तो त्रागा
अडकले का पाऊल?
त्या सावलीमध्ये .........

शितल .........