$$$ खर प्रेम तेच ........$$$

Started by विजय वाठोरे सरसमकर, July 20, 2015, 01:50:52 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$$$ खर प्रेम तेच ........$$$

खर प्रेम तेच......
जे जीवन जगण्या देईल बळ
ज्यात नसेल कोणताही संकोच
जीवनाच्या प्रत्येक वळणावर देईल पाठबळ

खर प्रेम तेच......
जे ओठांवर देईल सदैव हसू
ते आठवतच येईल नयनात पाणी
त्यास खर प्रेमच लागत पुसू

खर प्रेम तेच.....
जे हृदयात असत शेवटपर्यंत साठवून
ज्याच्यामुले मिळते प्रत्येकास प्रेरणा
जे क्षणोक्षणी त्यास पाहत असत आठवून

खर प्रेम तेच
ज्यात छोट्या छोट्या रात्री लांबत जातात
त्यामुळेच मनाची बेचैनी वाढत असते
खर प्रेमच सुख-दुख:त सहभागी होत जात

खर प्रेम तेच.....
ज्यात असेल आपल्या मितवा चीच वाट पाहत राहण
तेच जन्मोजन्मी मिळो हेच मागण
शेवटपर्यंत त्यासाठीच आपल आयुष्य खर्च करत राहण .

                           विजय वाठोरे सरसमकर
                              9975593359