पाऊस

Started by kavita kshirsagar kulkarn, July 21, 2015, 02:34:40 PM

Previous topic - Next topic

kavita kshirsagar kulkarn

पाऊस ....

थेंब थेंब झिरपतो
माझ्या मनात पाऊस
अशा अवेळी साजणा
नको असा रे पाहूस

तुझ्या पाहण्याने अशा
झाड लाजरीचे होते
पान एकेक मिटुन
मी रे बावरुन जाते

मी रे लाजताना अशी
वारा खट्याळ होतोस
गंधाळल्या आवेगात
मला ओढू पहातोस

तुझा गुलबक्षी गंध
माझा पदर झेलतो
आणि हासुनिया मंद
असा मला न्याहाळतो

असा पाहताना नको
गीत कोरडे गाऊस
बघ अजुनी झिरपे
माझ्या मनात पाऊस ......

कविता क्षीरसागर कुलकर्णी