पलीकडून फक्त पाऊसच ऐकू येतो

Started by sachin_sawant, July 22, 2015, 10:46:42 AM

Previous topic - Next topic

sachin_sawant

भरगच्च भरलेल आभाळ पाहून
पाऊस येतो मनामधे दाटून

आतुरलेले थेंब साचतात मौनावरती
अनोळखी शब्द सुचतात ओल्या रस्त्यावरती

खिडकीपाशी रेंगाळता रेंगाळता
काचेवर ओला ओरखडा पडतो

अधीरतेने मी तुला फोन करतो
पलीकडून फक्त पाऊसच ऐकू येतो

पलीकडून फक्त पाऊसच ऐकू येतो

- सचिन सावंत