शाळेच्या वेळेत

Started by mangesh.xp, December 10, 2009, 04:24:43 PM

Previous topic - Next topic

mangesh.xp

शाळेच्या वेळेत

गलक्याने मुले येतात चहुबाजूने
ठरवून यावीत तशी
आणि नेटावे टांगतात आकाशाला वर
मैदान साफ करून त्यांना खेळायचे आहेत खेळ
शाळेच्या वेळेत.
दप्तरं ठेवली आहेत त्यांनी आकाशाखाली झाकून
संतोष चांगला खेळतो म्हणून त्याला
घेत नाहीत खेळायला.
त्याचा खेळ कोणीसुद्धा पाहिला नाही अद्याप
तो उभा राहतो सरबताच्या गाडीजवळ
शाळेच्या वेळेत
बाजूचा सर्कस तंबू
मुख्याध्यापकांसारखा उभा आएह नजर रोखून
त्याकडे मुलांचे लक्षच नाही
मुले खेळताहेत खेळ
शाळेच्या वेळेत.
सूर्याला टोलवून संध्याकाळ देते
शाळा सुटल्याची बेल
मुळे पांगतात घराच्या दिशेने
पुस्तकांच्या मैदानातून परतल्यासारखी
निघताना आकाशाला सामुदायिकपणे
सैल करतात मैदानावर पालकांचा धाक हरवलेली दप्तरं
आकाशाखाली झाकून राहतात रात्रभर.
पहाटे सर्कसचा तंबू हलवताना
आकाशही गुंडाळून नेले जाते दुसऱ्या शहरात
आणि छातीला लावलेल्या ओळखपत्रासारखी
दप्तरे पोरकी होतात मैदानावर
शाळेच्या वेळेत.

madhura