मन उनाड उधान..!!

Started by Archana...!, August 10, 2015, 12:56:44 PM

Previous topic - Next topic

Archana...!


मन उनाड उधान, मन उनाड उधान.. 
जणू भिरभिरणारं पान, गाई रानातल गाणं,
पंख लावूनी वार्याचे, उडे होऊनी बेभान,
मन उनाड उधान...२

कधी दूर गगनात, कधी खोल सागरात...
मन मनाच्या धुंदित, जाई चंद्र-चांदण्यात,
ना भय त्यास उरे, फिरे स्वच्छंद होऊन,
मन उनाड उधान...२

इंद्रधनुपरी झाले, मन सप्तरंगी आज,
कसे सजले नभात, लेऊनीया नवा साज,
जणू नभ ही आज, माझ्या मनाचे अंगण,
मन उनाड उधान...२

दूर वेदनेचा गाव, आज नाही त्याला ठाव,
पुन्हा आस मनी जागे, होइल सुखाचा वर्षाव,
आज खुणावत आहे, नव्या आशेचा किरण,
मन उनाड उधान...२

मन स्वप्नांच्या कुशित, निजे तान्ह्या बाळागत,
गोड निरागस हसू, कसे उमटे गालात,
जग झोपले जरी हे,जागे मनातच मन,
मन उनाड उधान...२

अर्चना... ;)