*** इतकी रागवलीस ***

Started by धनराज होवाळ, August 10, 2015, 09:08:32 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

 :(

इतकी रागावलीस...???

इतकी रागवलीस की,
बोलणार हि नाहीस..
एकदा का होईना पण,
मला माफ करणार ही नाहीस..??

तुला माहित आहे ना,
तुला किती Miss करतो..
सर्वात जास्त तर परी,
तुझ्यावरच तर प्रेम करतो..!!

माझं तुटलेले गं हे मन,
परत तु जोडणार ही नाहीस..
एकदा का होईना पण,
मला माफ करणार ही नाहीस..??

एक क्षणही तुझ्याशिवाय,
आता वेळ ही जात नाही..
तु नसलीस ना की मन,
माझं कशातही रमत नाही..!!

एकदा तरी हास ना गं,
की कधीच हसणार नाहीस..
एकदा का होईना पण,
मला माफ करणार ही नाहीस..??

तुझ्याशी नाही बोललो,
तर अन्न गोड लागत नाही..
माझ्या हरवलेल्या नजरेला,
दुसरं काही दिसत ही नाही..!!

ए सांग ना गं आता की,
काहीच सांगणार नाहीस..
एकदा का होईना पण,
मला माफ करणार ही नाहीस..??

कोणी प्रेम नाही दिले,
सर्वांनीच झिडकारले..
ह्या दुर्दैवी जीवाला,
फक्त तूच प्रेम दिलेस..!!

कसे फेडू उपकार तुझे,
सात जन्मांत जमणार नाही..
एकदा का होईना पण,
मला माफ करणार ही नाहीस..??

खऱ्या प्रेमाची किंमत,
फक्त मलाच कळू शकते..
खऱ्या माणसांची किंमत,
तुलाच मात्र कळू शकते..!!

परी तु नाही विचारले तर,
मला कोणी विचारणार नाही..
एकदा का होईना पण,
मला माफ करणार ही नाहीस..??

जीवापाड तुझ्यावर प्रेम मी करतो,
माझ्यावर थोडंसं पण करणार नाहीस..
शेवटचं पण एकदा का होईना पण,
तुझ्या या प्रेमवेड्याला माफ करणार ही नाहीस...???
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949


(मुळ कविता :- प्रेम मंडले
संपादित :- प्रेमवेडा राजकुमार)