$$$$ नशीब $$$$

Started by विजय वाठोरे सरसमकर, August 11, 2015, 08:12:50 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$$$$  नशीब $$$$

जी माणसं हवीशी वाटतात ,
ती माणसं भेटत नाहीत .

जी माणसं नकोशी वाटतात ,
त्यांचा सहवास संपत नाही .

ज्यांच्याकडे जावेसे वाटते ,
त्यांच्याकडे जायला जमत नाही .

ज्यांचाकडे जावू नये असे वाटते ,
त्यांच्याकडे जावेच लागते .

जेव्हा जीवन नकोशे वाटते ,
तेव्हा काळ संपत नाही.

जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो ,
तेव्हा काळ संपलेला असतो .

नशीब हे असच असते ,
त्याच्याशी जपून वागावे लागते ,
तिथे कोणाचेही चालत नाही .......!

                           unknown author
                          संपादित :-   साहिल वाठोरे