*** सांग काय चुकलं गं माझं ***

Started by धनराज होवाळ, August 11, 2015, 09:49:19 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


सांग काय चुकलं गं माझं.. ??
:(
वेड्यासारखा जीव लावला,
मी स्वप्न पाहीलं फक्त तुझं..
एवढं सगळ करुन ही सखे,
सांग काय चुकलं गं माझं..!!

या जगाला खोटं ठरवुनी,
मी बोलणं ऐकलं फक्त तुझं..
तरी सुद्धा तुला मीच परका,
सांग काय चुकलं गं माझं..!!

मनापासुन मनावर प्रेम केलं,
मला करुन टाकलं फक्त तुझं..
तरी सुद्धा नुसतेच संशय,
सांग काय चुकलं गं माझं..!!

मी भेटण्याचे प्रयत्न ही केले,
तरी भेटणे लांबलं फक्त तुझं..
तरी सुद्धा तुझी वाट पाहतोय,
सांग काय चुकलं गं माझं..!!

मी सोडून साऱ्या जगाला,
खोटेपण साफ दिसलं फक्त तुझं..
तरी सुद्धा तुला समजुन घेतलं,
सांग काय चुकलं गं माझं..!!

स्वतःचे आरोप दुर करुनही,
या नात्यात चुकलं फक्त तुझं..
तुझे आरोप मी मजवर घेऊनही,
सांग काय चुकलं गं माझं..!!

तरी पण मजवर अविश्वास,
आपल्यात प्रेम घटलं फक्त तुझं...
तरी मनापासुन माफी मागतो,
आता सांग काय चुकलं गं माझं... ???
-
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली
Whatsapp :- 9970679949
FB :- http://m.facebook.com/PremVeda143