शब्द

Started by Manju2015, August 12, 2015, 07:29:18 PM

Previous topic - Next topic

Manju2015

क्षण ते वेचताना मन माझे हरविलेे
काव्यातलया शब्दांना सूर आज मिळाले

आज माझ्या जिवा भास एक झाला
जसे हया मनाला प्रेमाने तो साद घाले

बघता त्या दिशेने काहीच मला दिसेना
आभास हा माझा ..की मीच आतुर झाले?

खेळ भावनेचे आज रेशमी शब्दात गुंतले
मखमली उबेत आज मन असे का सुखावले

भावानेतला तो भाव शब्दात आज रंगु दे
खळखळत्या झरया परी स्वछंद आज वाहु दे..