*** एक सुंदर कविता ***

Started by धनराज होवाळ, August 13, 2015, 09:06:51 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


काहीवेळा मी समजुन घेतो,
पण समजुन ती ही घेत नाही..
काहीवेळा ती समजुन घेते,
पण समजुन मी ही घेत नाही..!!

काहीवेळा नाराज मी होतो,
पण रुसवा ती ही काढत नाही..
काहीवेळा नाराज ती होते,
पण रुसवा मी ही काढत नाही..!!

काहीवेळा भांडण मी करतो,
पण साॅरी ती ही बोलत नाही..
काहीवेळा भांडण ती करते,
पण साॅरी मी ही बोलत नाही..!!

काहीवेळा मला बोलायचं खुप असतं,
पण माझं ती ही ऐकत नाही..
काहीवेळा तिला बोलायचं खुप असतं,
पण तिचं मी ही ऐकत नाही..!!

काहीवेळा मला रडायचं खुप असतं,
पण मिठीत ती ही घेत नाही..
काहीवेळा तिला रडायचं खुप असतं,
पण मिठीत मी ही घेत नाही..!!

तरीही आम्हाला एकमेकांची ओढ,
पण प्रेम कमी ती ही करत नाही...
तरीही एकमेकांशिवाय करमत नाही,
कारण प्रेम कमी मी ही करत नाही...!!!
-
फक्त तिचाच,
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
9970679949