सर ..

Started by विक्रांत, August 14, 2015, 09:01:29 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

आताच सर एक बरसून गेली
वर्षाव सुखाचा करून गेली
सांजवेळ कातर आकाश धरेला
कोपरा मनातील उजळून गेली

तोच तो ध्वनी कोवळा मधुर
एक एक पेशी जागवून गेली
तरीही जगणे व्याकूळ असे की
तहान जीवाची वाढवून गेली

रेशमी नजर सुखाची ती ओली
जळत्या मना निववून गेली
कुढत्या खुळ्या जीवा जगाया 
कारण नवे एक देवून गेली

हरपले भान धुंदी दाटलेली
तन मन क्षीण वादळून गेली
हरवले काय सापडले कळेना 
सुखात मजला गोठवून गेली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/