*** मी शब्दवेडा ***

Started by धनराज होवाळ, August 18, 2015, 06:50:12 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुला सखे पाहुनीया भुलली,
माझ्या नयनांची गं जोडी..
केव्हाची अंथरलेय तुझ्यासाठी,
माझ्या कवितांची गं पायघडी..!!

कवितेच्या पायघडीत,
तुझ्यासाठी शब्द लिहीले..
कवितांची होडी करुन,
प्रेमसागरात त्यांना वाहीले..!!

तुझ्या नयनातल्या सागरात,
सखे मी चिंब नाहून गेलो..
कवितांच्या होडीत बसल्यावर,
अश्रूंच्या लाटेत न वाहून गेलो..!!

त्या कवितांच्या होडीत,
शब्दांचा सुंदर गाव होता..
शब्दांचा जन्म ही सखे,
तुझ्यासाठी होत होता..!!

तुझ्यासाठी लिहता लिहता,
सखे मी तुझाच होत गेलो...
प्रेमवेडा तर मी होतोच तुझा,
आता शब्दवेडा होत गेलो...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
पलुस,  जि. सांगली
9970679949

akash poman