घे उड्डाण

Started by sachinikam, August 19, 2015, 12:50:09 PM

Previous topic - Next topic

sachinikam

घे उड्डाण

घे उड्डाण, घे घे उड्डाण
थांबू नको आता, भिऊ नको आता
नको मागे वळू, शोध नव्या वाटा
जोखमीचे काम आहे, गड्या तू जाण
           ... घे उड्डाण

हवे जे आहे तुला, आहे तुझ्याचपाशी
कशाला दोष पाहशी, कुंडली नि राशी
नको करू खंत, होशील तू जयवंत
झेलायाला आव्हाने, एकवटून बळ अनंत
भिड बिनधास्त, नि उडव दाणादाण
           ... घे उड्डाण

नाही जमणार बसून आता
झोपायचे तर मुळीच नाही
ठेव ध्यास ध्येयाचा, चौफेर अभ्यास विषयांचा
कर सामना नेटाने, आडवे आले जरी तुफान
           ... घे उड्डाण

सोड अंधाराची भीती, पेटव नव्या वाती
घेउनि मशाल हाती, उजळूदे घन्या राती
जोशमध्ये होशचे असुदे जरा भान
           ... घे उड्डाण

पंखांमध्ये आता भरूदे आता, शतपटीने बळ
मेहनत कर, प्रयत्न कर, मिळेल इच्छित फळ
सापडे हिरा खणता कोळशाची खाण
           ... घे उड्डाण

घे उड्डाण, घे घे उड्डाण
उंचवायची आहे आता, तुला आमची मान
असुदे एकच ध्यान, फडकवायचेय विजयी निशान
           ... घे उड्डाण

कवितासंग्रह : मुग्धमन
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com

sachinikam

घे उड्डाण, घे घे उड्डाण
थांबू नको आता, भिऊ नको आता
नको मागे वळू, शोध नव्या वाटा
जोखमीचे काम आहे, गड्या तू जाण
           ... घे उड्डाण