तेवढ झालं की मन सैल होतं...

Started by Rajesh khakre, August 19, 2015, 05:28:31 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

कातरवेळी कधी मन अवचित भरुन येतं
बाहेर जाणारा आवंढा तसाच गिळून घेतं
पापण्याच्या कडा ओलावून ह्रदय भरुन येतं
असं नाही की ते दुःखच असतं...तेवढ झालं की मन सैल होतं...

कधीकधी पाऊस पडताना अचानक थांबून जातो
टपटपणारे थेंब अंगावरुन अलगद खेचून घेतो
आकाश मात्र काळ्या ढगांनी खुप भरुन येतं
असं नाही की तो दुष्काळ असतो...तेवढ झालं की मन सैल होतं

कधी काळी आपली असंणारी माणसं आघात करतात
मनाला असह्य अशा कितीतरी जखमा करुन जातात
मन विव्हळत राहते ते कुणा नाही कधी दिसत 
असं नाही की मनाला वेदना होत नाहीत... तेवढ झालं की मन सैल होतं...

सुखदुःखाचे डोंगर खुप येतात आयुष्यात आधाराचे हातही आयुष्याला सावरतात
जग विरोधी आपल्या असं ही वाटून जातं
पण असं नाही की कुणी आपलं असत नाही... तेवढ झालं की मन सैल होतं...
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com