जीवन

Started by श्री. प्रकाश साळवी, August 20, 2015, 12:31:44 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तू दिले अन घेतले मी
अजून बाकी काही राहिले
डोक्यावरून पाणी गेले
हे जीवन तुजला वाहिले

जगलो मनमुराद आयुष्य सारे
दुखः सारे टाकिले गिळोनी
सुखाची न कधी केली तमा मी
ना पहिले कधी मागे वळोनी

गीत गाईले कधी ईश्वराचे
मागणे न काही मागितले
दिले आहे सारेच त्याने
बुरे कुणाचे ना कधी चिंतले

धुंद - बेधुंद असा मी
शोध त्याचा घेत आहे
व्यर्थ न व्हावे जगणे माझे
याला " जीवन" ऐसे नाव आहे

श्री प्रकाश साळवी