हा असा पाऊस..

Started by Pravin Raghunath Kale, August 20, 2015, 04:16:50 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

हा असा पाऊस
---------*--------*-------
हा असा पाऊस
अधीमधी कोसळतो
नकळत मला मग
तो दिवस आठवतो

तो आणि मी
सोबतीला खट्याळ पाऊस
चिंब पावसात भिजण्याची
दोघांनाही पुरेपूर हौस

त्या दिवशीही असाच
दोघे मनसोक्त भिजलो
चिंब पावसात भिजताना
जगाला विसरुन गेलो

आजही पाऊस पडताना
मला ती आठवते
ती नसल्याचे आठवून
डोळ्यात पाणी साठते
---------*--------*-------
प्रविण रघुनाथ काळे
मो : 8308793007
www.facebook.com/kalepravinr
Pravinkalemy.blogspot.in