प्रेमाचे अवशेष

Started by jaydeshmukh2@gmail.com, August 21, 2015, 12:00:34 AM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com

प्रेमाचे अवशेष

डोळ्यातलं पाणी जणु असं काही आटलं होतं,
विचारताच म्हणालं "तीचं"प्रेम ह्यात दाटलं होतं,

नजरेचा नजरेत नजरेला पडताना असं काही मी पाहीलं हाेतं?
नकळत का होईना मीही अश्रुचं फुल वाहीलं होतं,

ह्रुदयाचं गणित मात्र थोडसं वेगळं होतं,
त्याचासाठी "प्रेम "हेच काही सगळं होतं,
आठवणीतुन वेगळं होताना त्याचा एक एक ठोका चुकत होता,
खरं प्रेम कदाचीत आज तो मुकत होता,
मन मात्र शांतपणे हे सारं पाहत होतं,
चंचलपणाचं ओझं आपल्या खांद्यावर वाहत होतं,
एकेकाळी फुललेलं ते मन आज कोमेजुन गेलं,
प्रेम हाच एक इतिहास आहे असं ते समजुन गेलं,

आठवणी त्या जुन्या मात्र शब्द नव्याने सझले होते,
असे काहीसे मी ही प्रेमाचे अवशेष मोजले होते.

कवी
संदेश घारे,
विक्रोळी,मुंबई