तुझसे नाराज़ नहीं...

Started by शिवाजी सांगळे, August 24, 2015, 10:26:32 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तुझसे नाराज़ नहीं...

आपलं जीवन किती अजब आहे नाही? अनेक समस्या, अडचणी समोर असुन सुध्दा आपण जीवनावर कधी नाराज नाही होत,  कसंही करून आपण ते जगतच असतो, ते सुध्दा अनेक प्रश्न घेवुन.
सामान्य माणसाची हिच वेदना कवीवर्य गुलजार साहेबांनी खुप तरल व सहज पणे गाण्यात मांडली आहे, ते म्हणजे शेखर कपूर दिग्दर्शित, १९८३ साली प्रदर्शित झालेल्या मासुम चित्रपटातील "तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं" हे गाणं ...

जीवनात येणा-या अनेकविध घटनांवर भाष्य करताना गुलजार म्हणतात "हे जीवना, मी जरी तुझ्यावर नाराज नसलो तरी, तू जे रोजच्या रोज भोळे भाबडे प्रश्न निर्माण करतोस त्यांच्या मुळे मी जरूर त्रासलेला आहे, परेशान आहे, ग्रासलेला आहे."

तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं

संगीतकार आर.डी. बर्मन यांनी गाण्याची चाल इतकी सुंदर बांधली कि हे गाणं आजही सहजपणे ओठांवर रेंगाळतं, लता मंगेशकर व अनुप घोषाल यांनी तीतकच तन्मयतेने सुंदर गायलय. पडदया वरील कलावंत अनुक्रमे शबाना आझमी व नसिरूध्दीन शहा यां दोघांनीही मुला संबधीचे मनातील द्वंद्व आपल्या सहज सुंदर अभिनयाने गीतातील शब्द अक्षरशः जीवंत केले आहेत.

जगण्यासाठी मला दुःख संभाळावे लागेल, आणि ते दुःख संभाळतां संभाळता हसावे म्हटल तरी ते हसु जणु जगण्यासाठी घेतलेले कर्ज आहे असे वाटते, हसतांना सतत असा भास होतो कि मी जणु ओठांवर कर्ज घेवुनच  हसतोय.... यांचा मी कधी विचारही केला नव्हता.

जीने के लिए सोचा ही नहीं
दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुराने के
क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है
जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है
तुझसे...

ऐेरीक शेगल यांच्या कादंबरीवर आधारीत चित्रपटाची पटकथा, संवाद व चार गाण्यांची जबाबदारी गुलजार यांनी त्या त्या व्यक्तीरेखांना योग्य न्याय देवुन लिलया पेलली आहे. ते जीवनाला पुढे म्हणतात "एक मात्र मान्य करावेच लागेल कि, तु दिलेल्या दुःखांनी मला नात्यांची नवीन ओळख/परीभाषा समजावुन दिली, वेदना तर झाल्याच, पण पोकळ सहानुभुती दाखविणारेच जास्त भेटले, जसं कधीतरी कडक उन्हात शितल सावलीचे भास होतात, केवळ तशी चाहुल दाखविणारेच सारे भेटले होते".

ज़िन्दगी तेरे गम ने हमें
रिश्ते नए समझाए
मिले जो हमें धूप में मिले
छाँव के ठन्डे साये
तुझसे...

प्रत्येक कलाकार आपल्या सृजनशील वृत्ती नुसार बाहेरील घटना बघत असतो व त्या प्रमाणे त्याची कलाकृती निर्माण होते, गुलजार मुळातच हळवे आहेत, त्यांचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन बराच आशावादी, थोडा हळवा आहे, चांगल्या भविष्याचा विचार करून ते लिहितात याची साक्ष आजच्या काळातील त्यांची गाणी ऐकताना पटते. 

ते पुढे लिहितात आज मनात भरून आलेल्या सर्व भावना, आठवणी कधी, कश्या व्यक्त होतील हे सांगता नाही येत, त्याची शाश्वती देता येत नाही. डोळ्यांच्या पायघडया कधी कुणाची वाट पहात राहतील ते सुध्दा सांगता येत नाही. कोणाच्या तरी प्रतिक्षेत व्याकुळ झालेल्या या नेत्रात अश्रुचा जो एक थेंब मी कधीचा लपवुन, सांभाळुन ठेवला होता, तो कुठे गायब झाला आहे कि हरवला आहे? हेच मला समजत नाही.

आज अगर भर आई है
बूंदे बरस जाएगी
कल क्या पता किन के लिए
आँखें तरस जाएगी
जाने कब गुम हुआ कहाँ खोया
इक आंसू छुपा के रखा था
तुझसे...
   
अशाच आशावादी विचारांचा पाठलाग करता करता आपण सुद्धा आपलं जीवन व्यतीत करीत असतो, जगात असतो व शोधात असतो कुणाचं तरी न सापडणारं अस्तित्व.
= शिवाजी सांगळे, बदलापूर, +९१ ९४२२७७९९४१ & +९१ ९५४५९७६५८९ E mail: sangle.su@gmail.com(19 to 24.8.2015)
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


शिवाजी सांगळे

प्रतिक्रीये बद्ल धन्यवाद, स्वरा....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९