तिरंगा

Started by smadye, August 28, 2015, 11:46:30 PM

Previous topic - Next topic

smadye

      तिरंगा

लाल किल्यावरी फड्कुनी आज
स्वातंत्र्यदिन करितो साज
सजावटीने दिपुनी गेले डोळे
मज फडकाविले आनंदाने

मी मान मी शान
मी देशाचा अभिमान
मी तिरंगा, मी ध्वज
मातृभूमीचे रक्षण करण्या मी आहे सज्ज

केशरी मध्ये क्रांती दाखवितो,
हिरव्या रंगी उन्नती दिपवितो
शुभ्र खरेपणा सांगतो
लढवय्यांचे अशोकचक्र छातीवर मिरवितो

जो  सैनिक धारातीर्थी पडतो,
देशासाठी प्राण अर्पितो
स्वरक्ताने टिळा लावितो,
त्याला मी कुशीत घेतो

कोणी विजयी झाला, त्याने तिथे तिरंगा फडकाविला
हिमालयात उच्चासनिहि, मज लाविला
असा तुम्ही मला मान दिला
हृदयातूनी मला सन्मानिला

तुमच्या सन्मानाने भिजलो
विजयात तुमच्या मीही उन्चावलो
पण एका गोष्टीची आहे खंत मला
१६ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला का माझी पायदळी अवहेलना?

          सौ सुप्रिया समीर मडये