मन हे माझे

Started by SHASHIKANT SHANDILE, September 01, 2015, 04:27:12 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

काही सुधारणासह परत एकदा ही कविता मी सादर करतोय कृपया अभिप्राय द्यावे , जेणे करून काही कमी असल्यास सुधारणा करून उत्तम रचना तयार होईल!

एकदिवस मी अधीर झालो
   मन माझे परतले नाही
      काय ठाऊक काय जाहले
          मला काही उमगले नाही


कुठे हरविले कुठे राहले
   माझे काही चुकले तर नाही
       त्यादिवशी ते फिरता फिरता
           मज सोडूनं गेले तर नाही

याच विचारी गुंतून होतो
   आज अचानक चाहूल झाली
        डोळे वरती करून बघता
             मनराजेची स्वारी आली


मन उदास होते वेडे कुठले
   हसतं नाही बोलतं नाही
       करू काय त्यासं हसवाया
           हे तर काही मानत नाही


कुणाशी नाही वैरही याचे
   काय करावे सुचतं नाही
      रडते फक्त हे अधुनी मधुनी
         राग जीवाचे गातही नाही


मागणी केली उत्तर द्यावे
   पण ते काही सांगत नाही
      काय घडले कुठे हरवले
           भेद आपुले खोलत नाही


एकदिवस मन मला म्हणाले
    मीरे आता तुझ्यात नाही
        मी झालो आता दुसऱ्याचा
             तुला कधी मिळणार नाही


त्या दिवसाला रस्त्यावरती
   बघितंले मी बाहेर फिरतांना
       कुणीतरी जवळुनी माझ्या
           हलकेचं जरा दूर जातांना
   
दूर जातांना सोबत अपुल्या
   ती मलाही घेऊन गेली
      रूप देखणे जणू चांदणे
         ती मलारे हरवून नेली


बोलायाचे मन बोलून गेले
   सांगायाचे सांगून गेले
      ऐकून मलाही विचार पडला
          काय घोळ हे मनाशी झाले


देतं कुणाला ह्रुदयभान ते
   लपवित तर काही नाही
      प्रेमाचा हा खेळ निराळा
          मन हरवून तर आला नाही


जानिला मी भेद मनाचा
   जरी ते मज सांगत नाही
        हा तर होता खेळ प्रेमाचा
           ज्याचा अंत सुंदर नाही


एकदिवस मग मी सांगितली
    गोष्ट काही मोलाची
        कोण होती ती स्वप्न सुंदरी
            वळूनही जी बघतं नाही


रस्त्यावरती अनोड्खीशी
   एक मुलगी बघितली
       हरवून बसला तुजला तुरे
          बघूनही जी हसतं नाही


आकर्षण जो एक क्षणांचा
   तो प्रेम म्हणवत नाही
      प्रेम म्हणजे घोर तपस्या
          जी तुलारे जमत नाही


अरे मना मी तुला सांगतो
   कित्येक आले गेले
       प्रेमाच्या या खेळामध्ये
           सर्व हरवूनी मेले


तरीही म्हणतो तुला मिळावी
   जी तुला मिळणार नाही   
      लाख प्रयत्नं केले तरीही
          तुझी कधी ती होणार नाही


माझे म्हणणे पटले होते
   त्याने मान हलविली
      मला थांबवून मला म्हणले
          काही बोलायचे नाही


दे मला तू वेळ जरासा
    विचार करतो आहे
        सांगीतलेल्या तू बोलाचे
             चिंतन करतो आहे


काही दिवस मग गप्प होऊनी
   मन विचार करीत बसले
      एकदिवस मग हसता रडता
         येऊनी मला बिलघले


रडता रडता मला म्हणाले
   फार मोठी चूक मी केली
        तुझ्यासारख्या माणसाची
             फसवणूक माझ्याने झाली


तूच माझारे पाठीराखा
   तुझ सोडून कसा मी जाऊ
       तुझ्या सारखा मित्र गावला
           मग दुसरे जग कशाला पाहू
   
चूक माझी ही पहिली वहिली
     पुन्हा कधी चुकणार नाही
         तुझ्याविनारे कुणाच्या मागे
              मी कधी दिसणार नाही


प्रेमाचा मग खेळ संपला
   मन जोरजोराने हसले
      अश्याप्रकारे मन माझे हे
         माझ्यातच येऊनी वसले

अश्याप्रकारे मन माझे हे
         माझ्यातच येऊनी वसले


कृपया आवडल्यास नावानिशी समोर पाठवावी.


शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी :- ९९७५९९५४५०
दिनांक :- ०१/०९/२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!

swaraj

Swati Gaidhani (swaraj )

SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!

Smita111


SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!