ती

Started by Shri_Mech, September 01, 2015, 06:29:17 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

ती एक नाजुकशी कळी जी माझ्या जीवनात आली,
ती एक गोजिरी जी मनाला सुखावत राहिली,
ती एक मनमोहिनी जिची ओढ मनाला लागली,
ती एक अप्सरा जी सौंदर्याने मला भुलवत राहिली,

तिची नजर मला नेहमी खुणावत राहते,
तिच्या गालांची लाली नजरेत भरत राहते,
तिला पाहण्यातच सगळी वेळ निघून जाते,
अन जे बोलायचे असते ते मनातच राहून जाते,

तिची भेट म्हणजे ग्रीष्मातल्या धरणीवर पावसाची सर,
तिचा मधुर आवाज ऐकून मनाला जणू येतो वसंतातला बहर,
तिच्या हसऱ्या चेहऱ्याने जणू मनावर होतो जादुई असर,
ती एकटीच भरून काढू शकते माझ्या जीवनातली सर्व कसर....
Shri_Mech

विजय वाठोरे सरसमकर

खूपच छान कविता .....
..................
अश्याच छान  कविता करत राहा ...!
..............
.................
......................
.................पुढील वाटचाली करिता शुभेच्या !