मुखदर्पण

Started by sachinikam, September 03, 2015, 03:12:16 PM

Previous topic - Next topic

sachinikam


मुखदर्पण


जे तुझ्या मनी तेच माझ्या मनी
ओळखूनही का आपण असे अनोळखी
मांडू कसे शब्दांत जे जे आजवर जपलेले
तुला पाहता उधानले ते ते अंतरी लपलेले
विसरुनी देहभान जगीचे केले सर्वस्व अर्पण
उमटले सुस्पष्ट भाव मनीचे पाहिले "मुखदर्पण"


जसे विरघळावे केशर दुधात
तशी तू भिनलीस माझ्या मनात
जरी निखळले सारे तारे
मागेन तुलाच पुन्हा जीवनात
बाहुपाशांत मिटुनी नयन, भाळीचुंबन
साकारले स्वप्न पाहता प्रत्यक्ष "मुखदर्पण"


कवितासंग्रह: मुकुटपीस
कवी: सचिन  निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com



MK ADMIN