विद्ध मरण

Started by विक्रांत, September 05, 2015, 10:30:23 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तसे तर हे जीवन
जात आहे ओघळून 
हळू हळू अंधार मी
घेत आहे पांघरून

ती गाणी कालची तू
नकोच दावू म्हणून
प्रत्येक तान त्यातली 
बसली आहे रुतून

जमले तर ये जरा
किंचित वेळ काढून 
चार बाण रुतेलेले
हलकेच घे काढून

तेव्हाही दुखणारच
दु:ख ते वेगळेपण
साचलेले नसेल गं 
तयात विद्ध मरण

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/