शल्य

Started by स्वामीप्रसाद, September 06, 2015, 02:42:23 PM

Previous topic - Next topic

स्वामीप्रसाद

विसरुन गेलो सारे काही
परी आठवे दिवस तो तुझ्या मिठीचा
ठरवून ही विसरु देत नाही
तीळ तो तुझ्या ओठीचा....

वचन दिले होते तुला
तव मिठीत शिरताना
शेवटचा ह्रुदय ठोका
तुजसाठी असेल मरताना....

गतजन्मीच्या या साऱ्या आठवणी
स्मरतात सये तुला बघताना
शल्य मनी एकच बोचे
तुला मी न आठवे, समोर तुझ्या असताना....

-स्वामीप्रसाद