$ बहिणाबाई चौधरी $

Started by विजय वाठोरे सरसमकर, September 07, 2015, 02:40:05 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$ बहिणाबाई चौधरी  $

मराठीतील या अशिक्षित पण प्रतिभावंत कवयत्रीचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी
ई.स.१८८० मध्ये झाला .आई -वडील अशिक्षित पण सुसंस्कृत होते .बहिणाबाई यांना शाळेत
जाण्याची संधीच मिळाली नसल्याने त्या निरक्षरच राहिल्या .परंतु त्यांच्याकडे काव्याराचानेची
जन्मताच अत्युच्च प्रतिभा होती .
                       त्या घरकाम करत असतांना विविध विषयांवर ओव्या रचून गात असत .
मराठीतील ख्यातनाम  कवी सोपानदेव चौधरी हे त्यांचे पुत्र .बहिणाबाईंचे एक नातेवाईक
अनेकदा बहिनाबाईंच्या  सोबत असत .बहिणाबाई उत्स्पुर्तपने ओव्या गात असतांना ते
आप्त त्या ओव्या कागदावर उतरून  घेत असत .अशा अनेक ओव्या त्यांनी वहीमध्ये
लिहून ठेवल्या.बहिनाबाईंच्या निधनानंतर त्यांचे हे काव्य आचार्य अत्रे यांच्या निदर्शनास
आले .या काव्यातील साधेवाना व वास्तवता पाहून आचार्य भारावून गेले आणि त्यांनी
बहिणाबाईचे काव्य प्रकाशित करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला .आचार्य अत्रे यांनी
बहिनाबाईंच्या गीतांना विस्तृत प्रस्तावना लिहिली आणि १९५२ मध्ये "बहिणाबाईंची गाणी " पुस्तकरूपाने प्रसिध्द झाली .या गीतांची दुसरी आवृत्ती
१९६९ मध्ये प्रसिद्ध झाली .
           दुसऱ्या आवृत्तीच्या प्रसिद्धीनंतर खऱ्या अर्थाने या "धरत्रीच्या आराश्यामाधी सगर " पाहणाऱ्या कवयत्रीची महाराष्ट्राला ओळख  झाली ."बहिणाबाईंची गाणी "  मध्ये बहिनाबाईंची ३५ काव्ये आहेत .बाकीची काव्ये वेळीच लिहून न घेतल्याने पुस्तकरूपाने प्रसिध्द झाली नाहीत .बहिणाबाईंनी कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता ,केवळ सहजधर्म म्हणून सुचलेली व मुखावाटे प्रकटलेली गीते गायिली .मराठीच्या दुर्दैवाने त्यांच्या सर्वच कविता अक्षरबद्ध झाल्या नाहीत .
              तसे झाले असते तर माय मराठीला एक फार मोठे वैभव प्राप्त झाले असते .
     बहिणाबाईंच्या  कविता वऱ्हाडी-खानदेशी या त्यांच्या मातृबोलीत रचलेल्या आहेत .माहेर-सासर-शेती-शेतीची साधने -पेरणी-कापणी-मळणी या दैनंदिन जीवनावर आधारित आणि अक्षय तृतीया-दिवाळी-पोल-पाडवा या अशा सणांवर त्यांच्या कविता आधारलेल्या आहेत .हेच त्यांच्या काव्याचे विशेष आहेत .

      " नही वाऱ्यांन हाललं ! त्याले पान म्हणू नही "  सारखी सुभाषिते .
     "अरे माणसा माणसा ! कधी व्हशील माणूस " सारखी तात्विकता
  किंवा
     बरा संसार संसार ! जसा तवा चुल्ह्यावर !
    आंधी हाताले चटके ! तव्हा मियते भाकर !

       यांसारखे काव्ये बहिणाबाईंनी लिहून एक विलोभनीय रूप प्राप्त करून दिले .अशा या महान अशिक्षित पण प्रतिभावंत कवयित्रीचे जळगाव येथे दिनांक ३ डिसेंबर १९५१ मध्ये निधन झाले . 

                                                  संपादक :- विजय वाठोरे सरसमकर