डोळ्यांचे अश्रू ...!

Started by जयंत पांचाळ, September 07, 2015, 05:34:19 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

हदयाचा चुकला ठोका
चुकलीच वेळही तेव्हा,
वेळेला कळले नव्हते
जग जगावेगळे झाले,
अश्रूंचेही आले अश्रू
डोळ्यांचे पानावले डोळे....

उशीरच थोडा झाला
हा दिवस वेगळा आला,
नशीबाची साथच नव्हती
मग कसले हेवेदावे,
अश्रूंचेही आले अश्रू
डोळ्यांचे पानावले डोळे....

मी आलो होतो तेव्हा
पण तीच नव्हती आली,
क्षण निसटूनी सारे गेले
सर्व इतिहास जमा झाले,
अश्रूंचेही आले अश्रू
डोळ्यांचे पानावले डोळे....

प्रयत्नांचे प्रयत्न थांबले
जिंकण्याचे जिंकने हरले,
दोषांचे दोषही संपले
मागे काहीच नव्हते उरले,
अश्रूंचेही आले अश्रू
डोळ्यांचे पानावले डोळे....

- जयंत पांचाळ
  ९८७००२४३२७