$$ मितवा $$

Started by विजय वाठोरे सरसमकर, September 08, 2015, 09:38:23 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$$ मितवा $$


आठवणार प्रेम तू कर या ना कर
वाट पाहण्याचं प्रेम मी जरूर करेन
गोष्ट मनातली तू सांग या ना सांग
बघितली तुझ्या डोळ्यात प्रेमाची चाहूल मी मितवा !

तुझ हसनच प्रेमाची हुलकावणी देत
तुझा नकारच माझ्यासाठी होकार
तुझ्या प्रेमात असा गुंतलो आहे
हृदय चोरनच जणू माझी सवय झालीय मितवा !

मला आठवत तुझ ते हसण
त्यासाठीच सतत माझ झटण
तू दिलेलं हे प्रेम आता माझा श्वास झालाय
प्रेम करणच माझा व्यवसाय झालाय मितवा !

तुजवीण जगण शिकलच नाही मी
तू मला मिळालेली देणगी झालीस
तुझ्यासाठी आयुष्यभर वाट पाहणारा
तुझा जीवनसाथी आहे मी मितवा !

                    कवी :- विजय वाठोरे(साहिल) सरसमकर
                                   9975593359

sandip pawade


punam kale