ओढ ओंजळभर पाण्याची.....!!!

Started by Ravi Padekar, September 08, 2015, 04:16:59 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

झाड म्हणे सागराला
कधी येईल हा पाऊस
काट कूट अंगावर आमची
पाण्याची ती हाऊस...

ऐकणा तू आमचे
देऊन पाणी तू ओंजळभर
सागर म्हणे झाडाला
कसे देऊ पाणी ओंजळभर
माझ्या लाटांनी जाशील तू वाहूनभर...

सागर म्हणे झाडाला
पाण्यासाठी विचारून बघ नदीला
झाड विचारे नदीला
देशील का पाणी आमच्या मुळाला...

नदी बोले झाडाला
कसे देऊ पाणी तुला थोडे
आमच्या प्रवाहानी
नाही झेपणार तुला एवढे...

नदी म्हणे झाडाला
बोलून बघ वाहत्या झरण्याला
मग झाड विचारे झरण्याला
करशील का ओलेचिंब आमच्या देठाला...

झरणे होईल तयार
पाणी देण्यास देठाला
पण प्रश्न उभे राहील समोर
माझे वळण आणणार कोण तुझ्या वाट्याला...

झरणे संगे झाडाला
एकदा विचारून बघ मानवाला
ओंजळभर पाण्यासाठी
धावून येशील का मदतीला...

झाड म्हणे मग सर्वांना
आधी त्यालाचं विचारले होते
पाण्यावाचून माझ्या फांद्यांना
त्यांनीच वेगळे केले होते

आता संपला माझा खेळ
नाही मानवाकडे वेळ.......!!!
                                    कवि:-  रवि सुदाम पाडेकर
                                             - ८४५४८४३०३४