मैत्रीचे कोन

Started by शिवाजी सांगळे, September 13, 2015, 07:48:38 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मैत्रीचे कोन

वर्तुळात ना रमलो केव्हा
ना चौकोनात अडकलो,
गुंतवित स्वत्वाला स्वतः
सप्तकोनात मैत्रीच्या गुंतलो!

म्हणायचो तेव्हा...

फ्रेन्ड सर्कलला गमतीने
मित्रांच "वाटोळ" कधी,
संगतीने खरच होतं?
का बरं वाटोळं कधी?

हरवलेत काळाआड, काही
रमले संसारी जीवापाड,
उरलेत मोजकेच आता
सप्तकोनाची ठेवुन चाड!

जुळत न् गळत गेले
कित्तेक "कोन" येथे,
आभासी जगी जाता
कोनात नित्य बदल येथे!


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९