तू समोर असताना

Started by Shri_Mech, September 18, 2015, 12:03:43 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

तू समोर असताना

शब्द उतरतात मनातून कागदावर,
तशीच तू येतेस मनातून माझ्यासमोर,
भान हरपून मी पहातच राहतो,
कसा हा जीव तुझ्यासाठी वेडावतो....

बोलायला लागली की मनाचा पिसारा फुलतो,
जणू काही एक ना एक शब्द वेचायला लागतो,
बाजच निराळा तिच्या बोलण्याचा,
प्राण लावून ऐकत राहण्याचा....

अशीच रहावीस तू कायमची,
हास्य मनावर फुलवणारी,
असाच वेचत रहावास पारिजातक अन्
तुम्हा दोघांच्या दरवळात सृष्टी नहावी....

Shri_Mech
Shri_Mech