त्या पावसात.

Started by sagar dubhalkar, September 19, 2015, 05:43:23 PM

Previous topic - Next topic

sagar dubhalkar

त्या पावसात

कालच्या त्या पावसात
मी पहीला पाऊस आठवला
अन् पापणीवर येण्या आधिच तो थेंब
तसाच डोळ्यात साठवला

उभी राहिले दारात उगीच
ओलं व्हावं सहज म्हणून
कदाचित त्यालाही कळलं आता
मला तुझी आठवण येते म्हणून

गरजु लागला तो ढग असा
कि धो धो लागला पडायला
मी लपवलेला एक एक अश्रु
तो बाहेर लागला काढायला

पाणावायचे डोळे रोज
पण लाज वाटे रडायची
उभी राहायचे दारी
आणि वाट पाहायचे पाऊस पडायची

मग त्या पडणाऱ्या पावसात
मी खळखळून रडायचे
गालावरच्या पावसाच्या थेंबात
अश्रू सहज बुडायचे

मी पुन्हा पुढच्या पावसापर्यंत
बंधन हेच पाळायचे
पाणावलेल्या डोळ्यातले थेंब
मी डोळ्यामधेच गिळायचे.

- सागर दुभळकर
  9604084846