माती

Started by nitin bahakar, September 21, 2015, 05:54:44 PM

Previous topic - Next topic

nitin bahakar

******माती*******
वाळलं हे रानं सारं
कसं कोरडं आभाळं
पिकावर जन्माआधी
कसा ओढावला काळं

केला कर्जाचा डोंगर
अन् पेरलं वावरं
आता तुया लेकराले
देवा तुच सावरं

मनी दाटलं आभाळं
नयनी आसवांचा पूर
पावसाच्या सरीसाठी
मन झालं हे आतूर

सा-या जगाचा पोशिंदा
दाण्या-दाण्याले मौताज
नेते कुरू खेळतात
आलं शेतक-यावर राज

गेले कोरडेच दिसं
अन् कोरड्याच राती
मातीसाठी राबणा-याच्या
झाली संसाराची माती


कवि-नितीन मनोहर बहाकर
बेलुरा ता.शेगाव
मो.9766006195