शब्द-सुर

Started by शिवाजी सांगळे, September 21, 2015, 08:23:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शब्द-सुर

"शब्द" म्हणजे भाव मनातला,
उस्फुर्त,आवाज खरा आतला!

शब्द कधी परक्यांना आपलं करणारा दुवा तर कधी कधी आपल्या लोकांना परकं करणारा दुभाजक.

शब्द जेव्हा कागदावर येतात तेव्हा दोन रूपं घेवुन येतात, गद्य आणि पद्य, त्यातही अनेक उप प्रकार घेवुन येतात, कधी लेख कधी ललित लेख, कधी निबंध कधी शोध निबंध, कधी कथा कधी कादंबरी वगैरे, पद्यामधे विचार केला तर ओवी ते अभंग, छंद ते दोहा, शेर ते गज़ल, चारोळी ते कविता,  असे अनेकविध प्रकार निर्माण होतात, ज्या मुळे ज्ञानवृद्धी तर होतेच त्यासोबत निखळ मनोरंजन सुद्धा होते.

अशाच शब्दांना जेव्हा स्वर सापडतो तेव्हा दुधात साखर व सोबत केशराचा योग येतो, ओवीचा प्रवास अभंगा पर्यंत होतो, एखादया  कवितेचं गीत तयार होतं, एकादया शेरची गज़ल तयार होते, कागदावरील साध्या वाटणा-या शब्दांतील भाव भावनांना वेगळा आशयगर्भ अर्थ मिळतो, छान उंची मिळते व सुंदरसा आकार मिळतो. गायकाने घेतलेल्या छानश्या आलापीने किंवा ताने मुळे केवळ वाचताना न उमगलेला एखादया शब्दाचा अर्थ चटकन समजतो, कुठेतरी मनातील कोप-याला हलवुन जातो, हे सारं होतं ते गायकाच्या स्वरांनी व संगीतकाराने बांधलेल्या चालींमुळे.

असचं काहीसं मी लिहीलेल्या काही शब्दांसोबत झालं उदा."रात्रीच्या कुशित आसवे पेरून आलो" किंवा "विठ्ठल सावळा" व वेगवेगळ्या भावनांची गाणी असो, माझ्या शब्द रूपी उघड्या बोडक्या अपत्यांना स्वर आणि सुर रूपी पेहराव, साज चढविला तो औरंगाबदच्या स्वर धारा आँक्रेस्ट्राचे सर्वेसर्वा  गायक व संगीतकार व  श्री मंगलसिंग सोळंके यांनी. तशी त्यांची माझी ओळख फेसबुकच्या माध्यमातुन दोन अडीच वर्षा पुर्वी झाली, त्या नंतर गेल्या वर्षी औरंगाबद व बदलापूर येथे दोनवेळा आमची प्रत्यक्ष भेट झाली होती, परंतु कार्य व्याप व वेळे अभावी त्या भेटींना उचित न्याय देता आला नाव्हता.

दि.१७.९.२०१५ रोजी गणेश चतुर्थी निमित्त सुटी असल्यामुळे आमची भेट माझ्या घरी झाली. दोघही निवांत होतो, मनसोक्त गप्पा झाल्या. शब्द, सुर, संगीत इत्यादि विषयांवरील गप्पांमुळे ब-याच गोष्टी नव्यानं समजल्या. एरवी गाणं एेकायला अडीच ते तीन मिनिटं लागतात, परंतु तेच गाणं तयार करतांना घ्यावी लागणारी मेहनत, त्यातील बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवताना घ्यावे लागणारे कष्ट त्यांच्या कडून समजले.

एक गायक व संगीतकार या व्यतिरीक्त श्री मंगलसिंग विनम्र, मितभाषी व एक उत्तम माणुस म्हणुन सुद्धा मोठे आहेत. फार कष्टातुन त्यांनी येवढ छान यश मिळविले आहे, उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

= शिवाजी सांगळे, 9422779941-9545976589 email: sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

अनारसे ज्ञानेश्वर

माणसाची मानसिकता बदलेल काय???
                          कोणत ही व्यसन हे वाईटच.मला आता पर्यंत एका प्रश्नान लईच छळलय.तो म्हणजे मला एखाद्या सवयीची , व्यसनाची पुर्णपणे वाईट आणि दुरोगामी परिणाम माहित असुनही मी ती सवय,व्यसन का त्यागू शकत नाही? सखोल चिंतन केल्यानतंर माझ्या काही बाजू लक्षात आल्या.●माणसाचा सहज स्वभाव वाईट गोष्टींकडे वळणारा असतो.●एखादी वाईट सवयी वा व्यसन आपल्याला एक प्रकारचा (मानसिक,शाररीक)आनंद देत असतो.●आपण ह्या गोष्टी किती ही पर्यंत करून नाहिशा करायच्या ठरवल्या तरी शरीराला व मनाला त्या गोष्टींची ओढ असते.●ह्या सवयींची,व्यसनांची त्यागाची इष्टता समजलेली असुनही ह्या गोष्टी आपण सोडल्या नाहीत तर आपण मानसिक आजारा ला बळी पडतो.आपण सर्वसामावेशक राहु शकत नाही. आपले विचार खुठिंत होतात आणि आपण पशु,जनावरासारखं वागु लागतो.●हे अस बराच काळ चालु राहिल तर माणसाची विवेकबुध्दी लोप पावू लागते.आणि त्याला विनाशी अशा भयंकर परिणांमाना सामोर जाव लागत●ह्या सवयी वा व्यसन त्यागण्यासाठी आपल्याला स्वता:च सखोल चिंतन करणं भाग असत.●त्या गोष्टीमुळे होणार्या जिवणाच्या सर्व बाजुंचे परिणाम चिकत्सक पद्ध्तीने मांडण गरचेच असत.त्यामुळे आपण सावध होतो.●सामान्य आणि असामान्य ह्यांच्या मध्ये फक्त चुका मान्य करण आणि त्या परत होऊ देण एवढाच फरक असतो●निराश मनात वाईट गोष्टी जास्तच फोफावतात.चितंनशील आणि आनंदी राहील्यामुळे वाईट सवयींचा हमला आपल्यावर होत नाही●आपल कतर्व्य आपल्याला माणुस बनवु शकत.
               एकुणच मानसिकता बदलल्यानंतरच आपण एका नव्या बदलाकडे जाऊ.
                           अनारसे  ज्ञानेश्वर
                            मो .न :9860942130

शिवाजी सांगळे

ज्ञानेश्वर अनारसेजी नमस्कार, माणसाची मानसिकता बदलेल काय? मधील आपले विचार खूप सुंदर आहेत, मानवाला वाईटाची गोडी जास्त असते... तो त्याच्या पाठी लागून जीवन वाया घालवतो.   
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९