मावळतीचे सुर बरसती या पहा

Started by yogesh desale, September 22, 2015, 11:02:23 AM

Previous topic - Next topic

yogesh desale

मावळतीचे सुर बरसती या पहा

मावळतीचे सुर बरसती या पहा,
शब्द या गंधात बुडवूनी पहा ।
सृष्टिच्या कागदा वरती रंग भरा,
अंतरीच्या मनाची साद ऐकुनी जगा ।।

का भुलवसी माझ्या मनाला प्रियकरा,
नयनांनी ओठींचे काम करा ।
मावळतीचे सुर बरसती या पहा...

काळोखाच्या आगमनाची ओढ मना,
तुज भेटण्याची आस का लागी मला।
मावळतीचे सुर बरसती या पहा.....
    . - योगेश देसले