प्रेमात असं का होतं ?

Started by MK ADMIN, January 25, 2009, 07:58:14 PM

Previous topic - Next topic

saayali_sachin

प्रेमात असं का होतं ?
एकाएकी जाणीव होते की त्याच्याशिवायही जगू शकते
त्याच्याशिवाय भर चांदण्यात गाढ झोप येऊ लागते
त्याच्या आठवणीने येणारा शहारा उमटेनासा होतो
आता ती त्याची मिठी नसते, तो फक्त वाराच असतो

त्याच्या नावाची हाक मारली तरी दचकेनाशी होते
त्याच्यावरून चिडवलं तरी, आता ती लाजेनाशी होते
फोनची वाट बघत नाही, वर स्वतःचा एंगेज असतो
त्याला! reply करायला तिच्याकडे balance नसतो

तो पिक्चरला बोलावतो तेव्हां मैत्रिणीशी गाठभेट असते
अचानक घरी जायचं असतं अन त्याची बस लेट असते
मुद्दाम त्याच्या ऑफिस वरून ऑटोही न्यायची नसते
तो काल काय करत होता याची नोंदही घ्यायची नसते

प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?

कुठे गेले ते मंतरलेले दिवस अन् धुंद रात्री
ती हुरहुर, ती जवळीक, ती लुटुपुटुची मैत्री
त्या हळव्या गोष्टी फक्त फक्त त्यालाच सांगण
त्याच्या तिच्या स्वप्नांत दिवस दिवस रमण

खूप भूक लागली असून अर्धा अर्धा वडापाव खाण
महिनों महिने लक्षात ठेवून त्याला आवडलेलं घड्याळ देण
त्याच्या क्रिकेटच्या वायफळ गप्पा तास न् तास ऐकून घेण
त्याला चिडून मनवून हट्टाने शौपिंगला घेउन जाण

प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?

त्याच्या बहिणीचा वाढदिवससुद्धा व्यवस्थित लक्षात होता
त्याच्या आवडत्या रंगाच्या ड्रएसेसच ढीग झाला होता
त्याच्या बरोबर घेतला तेव्हां हा teddy क्यूट वाटला होता
त्याच्या सोबत फिरताना कितीदा भयानक उशीर झाला होता

त्याच्या पत्रांचा ग्रीटिंग्सचा खच तिच्या गादीखाली होता
तिच्या पुस्तकाच्या मधल्या पानांत त्याचा 'तो' फोटो होता
त्यानं दिलेलं पहिलं रोझ इतके दिवस खालच्या खणात होतं
आणि कधीतरी आईबाबांना धीर करून सांगायचही मनात होतं

पण प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?

त्यानं सॉरी म्हटलं तरी तिने किती सहज फ़ोन ठेवला
छान तयार होउन, संध्याकाळी, चहा-पोह्यांचा ट्रे धरला.

by Anushree Vartak

It's a really nice one and very true in real life .

rudra

gaurig

renukachavan

Prachi

deokarrama

khup chhan