* धागे *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 26, 2015, 12:40:13 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* धागे *
करुन विचार काहीच होत नाही
जोपर्यंत कृतीला दिशा मिळत नाही
कोणत्याच बंधनातुन सुटका नाही
जोपर्यंत त्यांना तु तोडत नाही

घाबरुन कधी मार्ग निघत नाही
जोपर्यंत स्वताच तु रस्ते बनवत नाही
जागेवर थांबल्याने वेळ थांबत नाही
जोपर्यंत तु उठुन जागा होत नाही

दुख सहन करुनही ते मिटत नाही
जोपर्यंत सुखाचा अर्थ कळत नाही
जीवनाची संकट कमी होत नाही
जोपर्यंत त्यांना तु सामोरा जात नाही

तोडुन धागे पुन्हा ते जुळत नाही
जोपर्यंत नाते घट्ट बनत नाही
हातात हात तुझा आलाच नाही
तोपर्यंत चक्रव्युह हे तुटत नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938