*** प्रेम म्हणजे... ***

Started by धनराज होवाळ, September 30, 2015, 07:45:22 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

*** प्रेम म्हणजे... ***

प्रेम म्हणजे फक्त तिचं नि त्याचं नव्हे,
प्रेम म्हणजे एक आपलेपण..
प्रेम म्हणजे एक घरपण,
प्रेम म्हणजे मैत्रीचे दर्पण..
प्रेम म्हणजे आईची माया,
प्रेम म्हणजे बापाची छाया..
प्रेम म्हणजे दादाचं ओरडणं,
प्रेम म्हणजे ताईचं भांडणं..
प्रेम म्हणजे आजोबांच्या गोष्टी,
घर म्हणजे आजीने काढलेली नजरदृष्टी..!!

खरं तर,
प्रेम म्हणजेच गवताचं,
एक नाजुक पातं असतं....
हृदयाशी हृदय जोडणारं,
एक पवित्र नातं असतं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
मो. ९९७०६७९९४९