==* या मनाचं *==

Started by SHASHIKANT SHANDILE, September 30, 2015, 11:34:10 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

या मनाचं असच असतं
कधी हसतं कधी रडतं
या मनाचं असच असतं

तू हसली की बरं वाटतं
तू रुसली की मन दुखतं
काय सांगू साजणी तुला
या मनाचं असच असतं

सोबत असली की मजा
प्रत्येक क्षण हर्षावतो
दुरावली की मग सजा
प्रत्येक क्षण दुखावतो

या मनाचं असच असतं
कधी हसतं कधी रडतं
या मनाचं असच असतं

बोलण्यात बेधुंद तुजसवे
जगाचा विसर पडतो
तुझ्या डोळ्यात पाहतांनी
सर्वच दुखं विसरतो

या मनाचं असच असतं
कधी हसतं कधी रडतं
या मनाचं असच असतं

रहावत नाही तुझविन
भेटाया बहाने करतो
समजवतो किती तरी
तुझ्याच मागे फिरतो

या मनाचं असच असतं
कधी हसतं कधी रडतं
या मनाचं असच असतं
------------****------------
शशीकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी -९९७५९९५४५०
दि. २९/०९/२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!