तुज्या संगतीने, कलि फूल होते

Started by sameer3971, September 30, 2015, 03:14:07 PM

Previous topic - Next topic

sameer3971

तुझी ओढ होता मला लाज वाटे
तुज्या संगतीने, कलि फूल होते
तुझ्या आठवांचे पिसारे फुलावे
स्पर्शात तुझ्या ह्या चित्त गंधित व्हावे

उरी घेऊनी तू छ्ळवे असे ते
मिठीत मिलनाच्य, लटकेच रुसने ते
तुझी ओढ होता, मनी भाव होते
तुझ्या संगतीने कलि फूल होते

स्वप्नी पहिले मी, तुझे चित्र होते
डोळ्यात उतरलेले, असे रंग होते
तुझी ओढ होती, तुझे रूप होते,
तुझ्या संगतीने कलि फूल होते

पाण्यात उठलेले, तरंग नवीन होते,
हळूवार झुललेले ते, धूसर बिम्ब होते,
तुझी ओढ होता, जलास जाग येते
तुझ्या संगतीने कलि फूल होते

समीर
मालाड, मुंबई


Friends... please let me know your views to better myself, thanks. Sameer