खेळ मांडला वैर्यानी

Started by sanjay limbaji bansode, October 02, 2015, 03:53:54 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

खेळ मांडला वैऱ्यांनी खेळ मांडला
भीमा तुझ्या पिल्यांचा नाळ कांडला
चिळकांड्या उडाल्या रक्ताचा सडा सांडला
तुझाच अंगज आज तुला भांडला  !!


वैरी तो मनुवादी त्याला मित्र मिळाला
नवजात ते अर्भक अजगर गिळाला
घर सोडून दुश्मनांच्या दारात रांगला
तुझाच अंगज आज तुला भांडला !!

आपल्याच रक्ताशी त्यानं वैर रं केलं
पापवंत नाशवंत हे कसं निघालं
फास काळ पुन्हां त्या गद्दारी तोंडाला
तुझाच अंगज आज तुला भांडला !!

संजय बनसोडे 9819444028