दिलाची खिडकी

Started by vishal maske, October 04, 2015, 12:23:02 PM

Previous topic - Next topic

vishal maske

~!!! दिलाची खिङकी !!!~

कधी तु पहायचं,
कधी मी पहायचं,
आणि पाहताना हळूच,
गालातंच हसायचं,

हसण्यामागलं गूढ तूलाही,
अन मलाही कळतंय,
मग तूच सांग सखे,
काळीज का तळमळतंय,

तुझ्या फक्त नजरेनं,
मन हलकं हलकं होतंय,
त्या पोर्णिमेचं चान्दणंही,
जणु बोलकं बोलकं होतंय,

आता बस्स झालं सखे,
मला सोसवणासं झालंय,
ह्रदयामधलं बोलणं,
पार ओठान् पाशी आलंय,

पण काय सान्गु तूला,
मनात भरलीय धडकी,
तुच आता समजून घे,
आणि खोल दिलाची खिडकी...


विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
व्हाटस्अप :- 9730573783

Swapnil lohakare

Sakhe majyasathi tu khol dilachi khidki...!