अधुरी रात्र काढायची आहे

Started by sameer3971, October 08, 2015, 04:17:57 PM

Previous topic - Next topic

sameer3971

अधुरी रात्र काढायची आहे
कूस बदलूनी ती घालवायची आहे
उरीचे स्वप्न फुलायचे आहे
डोळ्यात ते उतरायचे आहे.

कळत नकळत जे घडले ते
तुला सगळे सांगायचे आहे
पहाट होताहोता फिरून एकदा
स्वप्नात त्या रमायचे आहे

कधी रे भेटशील तू सांगना
अधीर मन माझे बैचेन आहे
तुला बिलगून माझे गीत
तुला ऐकवायचे आहे

चंद्र सुद्धा खट्याळ का रे?
उगाच अंबरी तो रेंगाळत आहे
रवि किरणांची वाट कोठली
पुन्हा मी शोधीत आहे

कोवळ्या किरणात नाहूंनी
मुग्ध गंध कायेस लेवुनी
सजले रे मी भेटण्यासाठी
आतुर माझे चित्त आहे

दुरून पाहिले तुला अन
हूरहूर बघ वाढली माझी
स्वप्न समोर ते पाहता
उगाचच लाजायचे आहे

बाहूत तुझ्या उर्मी जागली
निरव शांततेत प्रीत जागली
कळलेच नाही कधी निशा उगवली
रात्र फिरून अधुरी झाहली.

परत...........
अधुरी रात्र काढायची आहे
कूस बदलूनी ती घालवायची आहे..................

समीर बापट
मालाड, मुंबई.