गर्दितले ओळखीचे चेहेरे लोप झाले

Started by sameer3971, October 12, 2015, 03:54:45 PM

Previous topic - Next topic

sameer3971

गर्दितले ओळखीचे चेहेरे लोप झाले
असे काय झाले की हसू लोप झाले.

कधी भावनांचा कल्लोळ होत होता
कधी संबंधांचा धागा अटूत होता
कधी कालचे स्वप्न कुठे लुप्त झाले
गर्दितले ओळखीचे चेहेरे लोप झाले
असे काय झाले की हसू लोप झाले.

पुढे जाण्याच्या स्पर्धेत धावताना
निसटलेले ते क्षण सुखाचे होते
कळले मनाला जेव्हा ते होते संपलेले
गर्दितले ओळखीचे चेहेरे लोप झाले
असे काय झाले की हसू लोप झाले.

शोधता ना सापडे ते आप्त् माझे सारे
दूर वर आलो मी एकटाच बाकी होते सुटलेले
एकांती वलणां वर आयुष्य चाललेले
गर्दितले ओळखीचे चेहेरे लोप झाले
असे काय झाले की हसू लोप झाले

समीर बापट
मालाड, मुंबई