* प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 17, 2015, 11:22:39 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* प्रेम *
कधी प्रेम म्हणजे सहवास
तर कधी फक्त आभास
कधी प्रेम एक संवेदना
तर कधी वेदनाच वेदना

कधी प्रेम गोड झरा
तर कधी समुद्र खारा
कधी प्रेम म्हणजे हास्यवारा
तर कधी फक्त अश्रुंधारा

कधी प्रेम मेळ जीवांचा
तर कधी तरल भावनांचा
कधी प्रेम कोमलस्पर्श नात्याचा
तर कधी खेळ वासनापुर्तीचा

कधी प्रेम नाव त्यागाचा
तर कधी नकळत बलिदानाचा
कधी प्रेम कठोर निर्णयाचा
तर कधी विरहात जगण्याचा
            कारण
प्रत्येकाचा अर्थच वेगळा आहे
इथे मुळी प्रेम करण्याचा
तसा सगळ्यांना हक्क मिळालाय
प्रेम कोणी कुणावरही करण्याचा.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

shradha ravindra palkar


कवी - गणेश साळुंखे