वेडया मना...

Started by शिवाजी सांगळे, October 21, 2015, 10:02:02 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वेडया मना...

अरे वेडया मना, मज तु सांग ना
जडली का मला, प्रित हि बघ ना।।धृ।।

स्वप्नात कसे, मज भास असे
हरवून जाण्याचे, का हे वय असे?
काय झाले मला, काहीच कळेना ।।१।।
अरे वेडया मना, मज तु सांग ना...

दिसे एक कोणी, राहे नित्य ध्यानी
जागता निजता, तेच असते मनी
हुरहूर मना अशी, का सांग ना?।।२।।
अरे वेडया मना, मज तु सांग ना...

मिळाले मला, भान हे जगण्याचे
कळू लागले, अर्थ मला स्वप्नांचे
भेटशिल कधी, स्वप्नप्रिय सांग ना?।।३।।
अरे वेडया मना, मज तु सांग ना...

अरे वेडया मना, मज तु सांग ना
जडली का मला, प्रित हि बघ ना।।धृ।।

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९