दसरा

Started by vishal maske, October 22, 2015, 07:03:53 AM

Previous topic - Next topic

vishal maske

दसरा

मनसोक्तपणे वाटतात सोनं
चेहरा ठेऊन सदैव हासरा
देऊन-घेऊन प्रेम-आनंद
असा साजरा होतो हा दसरा

आपटा आणि सौंदडीची
मग करण्यासाठी लूट
आनंदाची उधळण करत
सारे येतात होऊनी एकजूट

सोनं-चांदीची करूनी लूट
यशाची होते ती सुरूवात
लहाणांना मिळते प्रेरणा
मोठ्यांचे मिळतात आशिर्वाद

ते झेंडू तोरण दारावरचे
आनंदाने हसत डूलते
प्रसन्न ठेवते घरा-घराला
पाहून त्याला मन हे खुलते

विसरूनी द्वेश मना-मनातील
मनी आपुलकी पेरली जाते
गुण्या-गोविंदाने नांदत राहू
हिच पर्वनी ठरली जाते

वाटत राहू असाच आनंद
आपुलकीचा न सोडता पिच्छा
आनंददायी दसरा दिनाच्या
मंगल-मंगल-मंगल शुभेच्छा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783