मी प्रेमातली 'मैत्री' बोलतेय

Started by Suraj Nehete, October 25, 2015, 01:50:48 PM

Previous topic - Next topic

Suraj Nehete

"मी प्रेमातली 'मैत्री' बोलतेय..."

आकाशात तडपणार्या त्या सूर्याला ही
मायेच्या उबेची कमी भासावी,
असं कधी होऊ शकतं..??
असं होतं.
खूप जण आपले असतात, पण
कुणाची तरी कमी जाणवतेच..

आपल्याला कुणीतरी हवं असतं
आपल्याला जाणणारं, आपलं ऐकणारं
आपल्यावर प्रेम करणारं अन्
आपल्यावर विश्वास ठेवणारं...

असं कुणी आपल्या आयुष्यात येणं,
हा नियतीचाच भाग असतो.
एव्हाना ती नियतीच असते.
पण त्या व्यक्तीला ओळखणं,
आपल्याच हाती असतं ना.. ???
ओळखतो आपण.. ???

ती व्यक्ती येते,
'प्रेम' आणि 'मैत्री'च्या रूपानं...
पण खरंच यांचं वेगळं अस्तित्व आहे..??
म्हणजे मैत्रीशिवाय प्रेम आणि प्रेमाशिवाय मैत्री असं कधी असू शकतं..??
अर्थातच नाही..
मग मैत्रीला प्रेमाची किनार लागली की त्यातला ओलावा कमी का व्हावा..??
मैत्रीतलं प्रेम एकतर्फी असू शकतं,
तर मग मी पण एकतर्फी असते का..??
मैत्रीतल्या प्रेमाची चूक असू शकते,
तर मग मी निर्दोष नसते का..??
ही 'प्रेमातली मैत्री'
विचारतेय तुला प्रश्न,
न्याय माझ्यासोबत करशील ना..??
तू मैत्रीतलं प्रेम नाकारलंस
पण मला तरी स्वीकारशील ना..??

सुरज नेहेते
9730997511
भुसावळ, जळगाव


AmitRaj

खूप मस्त आहे .. कविता ...."मी प्रेमातली 'मैत्री' बोलतेय..."