३} मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानण

Started by Maha Ravindassa, October 27, 2015, 09:46:33 PM

Previous topic - Next topic

Maha Ravindassa


२२ प्रतिज्ञा : ३} मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही


आमच्या पिढ्यान पिढ्यावर अत्याचार होत राहिले
कोणत्या देवाला आमची दया आली नाही का त्यांनी आम्हाला दूर सारले
प्रेमाची करुणेची भाषा या देवांना कधी जमलीच नाही
मी गौरी गणपती यांची उपासना करणार नाही ।। धृ ।।
वक्रतुंड महाकाय या नावातच सार काही आले
अंगावरील मळापासून सांगा कोणी आहे जन्मले
मानवाच्या दगडाला प्राण्याचे शीर यांनी जोडले
कमाल नाही का आजला हे असले डॉक्टर कुठे मेले
मानवाच्या जीवनात या कथेची काहीच गरज नाही
मी गौरी गणपती यांची उपासना करणार नाही  ।। १  ।।
कार्य कोणतेही घ्या प्रथम स्मरण गणेशाचे करावे
दुर्जनाला प्रथम सज्जना नंतर वंदावे
ज्याला स्वतावरचे विघ्न दूर करता ना यावे
अश्या देवाला बहुजनाने का बरे पूजावे
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबांनीकरून रक्ताची शाही
मी गौरी गणपती यांची उपासना करणार नाही  ।। २ ।।
दुःखहर्ता म्हणून यांची देवगणात ख्याती
ज्ञानाची देवता अशीही ओळख होती
हत्तीचे मस्तक आणि मळाचा गणपती
सांगा हे तुमचे दुःख कसे बरे हरति
विज्ञानवादी बना बाबासाहेब म्हणती याचा अर्थ कळतो का काही
मी गौरी गणपती यांची उपासना करणार नाही  ।। ३ ।।
पार्वतीची किमया भारी केला मळाचा गणपती
आले महादेव भेटण्याला त्यांना ओळखेना हे महारथी
क्रोधाने लालेलाल झाले महादेव कैलासपती
उडवले मस्तक धडापासून असे देवी पार्वतीचे पती
अहो यांच्याच बायकोने निर्माण केला पुत्र याना कळाले नाही
मी गौरी गणपती यांची उपासना करणार नाही  ।। ४।।
एकीकडे कथा शंकराने मस्तक उडविले
दुसरीकडे कथा मस्तक विष्णूने उडविले
तिसरीकडे कथा आहे मस्तक पार्वतीनेच नाही बनविले
काय म्हणे तर तिला सामानच कमी पडले
यांच्या कथेतील विसंगती सांगते कथा खोटी आहे कि नाही
मी गौरी गणपती यांची उपासना करणार नाही ।। ५ ।।
गौरी गणपती ह्या देवता काल्पनिकच आहेत
यांची कृपा होईल  क्रोध होईल हे आपण न पाहावेत
जो समजतो स्वतःस बौद्ध ज्याने ज्यांच्या पासून दूरच राहावेत
सदा आचरणी मात्र बाबासाहेबाचे विचारच आणावेत
अरे वेड्यांनो बाबासाहेबांच्या विचारांचा अर्थ कळतो कि नाही
मी गौरी गणपती यांची उपासना करणार नाही  ।। ६ ।।

भिमरत्न सावंत

Nandkishor Kawale

तुझी करणी ज्ञात कुणाला
रे आला गेला वारा कुठला
तुझे रूप कधी कसे अन
रे कुणी पहिले सांग डोळा 

पोथीमधल्या सुरस कथा
कधी येतील मम वाट्याला
नकोच हंडा म्हैस दुभती
संपत्ती ती दिली रजकला 

अंगसंग क्षणिक दे जो 
रेवणनाथा पथी जाहला
दे देह मज चतुष्पदी तो
तव पदी सदैव राहीला 

घार होवून तू माझ्यासाठी
झेप घेवूनी ने उचलुनी
हो वनराजा गर्जत येवूनी
भक्ष्य जाय हे तव घेवूनी 

उभा कधीचा मी तव दारी
अत्रीनंदना कृपा करी रे
हे करुणाकर भक्तवत्सला 
मरणाचा या अंत करी रे